माद्रिद -स्पॅनिश लीग ला-लीगाच्या संघांनी 14 खेळाडूंच्या गटासह सोमवारपासून आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. प्रशिक्षण सुरू करणाऱ्या संघांमध्ये रीअल माद्रिद आणि बार्सिलोनाचा समावेश आहे. कोरोनाव्हायरसमुळे जगभरात फुटबॉल क्रियाकलाप मार्चपासून ठप्प आहे. गेल्या काही आठवड्यांपासून, विविध क्लबमधील खेळाडूंनी हळूहळू त्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे.
ला-लीगाचे क्लब प्रशिक्षणासाठी मैदानात
खेळाडूंनी प्रथम वैयक्तिक प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर त्यांनी 10 खेळाडू आणि आता 14 खेळाडूंच्या गटासह आपले प्रशिक्षण सुरू केले आहे. लीगची सुरुवात जूनच्या मध्यापासून होणार असल्याने इतर क्लब पुढच्या काही आठवड्यांत आपल्या संपूर्ण खेळाडूंसह प्रशिक्षण सुरू करू शकतात.

ली लीगाचे अध्यक्ष जॅव्हियर तेबास यांनी लीगची सुरुवात जूनच्या मध्यापासून सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तेबास म्हणाले, ''11 जूनपासून लीग सुरू करणे शक्य आहे. पहिला सामना रिअल बेटिस आणि सेव्हिला यांच्यात असू शकतो.''