कोची -भारताचा फुटबॉलपटू संदेश झिंगनची जर्सी नंबर 21 इंडियन सुपर लीगमधून (आयएएसएल) निवृत्त होणार आहे. केरला ब्लास्टर्सने ही माहिती दिली. झिंगनने गुरूवारी या क्लबला रामराम ठोकला. क्लबने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात निखिल भारद्वाज यांनी संदेशच्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.
भारद्वाज म्हणाले, "आम्ही संदेश आणि त्यांच्या समर्थकांचे समर्पण, निष्ठा, उत्कटतेबद्दल आभार मानतो. क्लब नवीन आव्हान स्वीकारण्यास इच्छुक असलेल्या संदेशचा आदर करतो. आम्ही नवीन प्रवासाबद्दल त्याचे अभिनंदन करतो. तो ब्लास्टर्सचा मनापासून नेहमीच चाहता असेल. क्लबमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव करत आम्ही त्याची 21 क्रमांकाची जर्सी कायमची निवृत्त करत आहोत."