तूरिन -इटालियन क्लब जुव्हेंटसचा खेळाडू आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मित्र पाउलो डायबाला कोरोनामधून सावरला आहे. जुव्हेंटसने ही माहिती दिली. "प्रोटोकॉलनुसार डायबालाची दोनदा चाचणी घेण्यात आली असून तो दोन्ही वेळेस नेगेटीव्ह आला आहे. त्यामुळे तो आता जास्त वेळ एकांतात नसेल'', असे क्लबने सांगितले.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मित्र कोरोनामुक्त - रोनाल्डोचा मित्र कोरोनामुक्त न्यूज
मार्चमध्ये पहिल्यांदा डायबालाची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर, गेल्या सहा आठवड्यात चौथ्यांदा डायबलाची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आढळली. पण आता तो त्यातून सावरला आहे. यापूर्वी त्याचा सहकारी डॅनियल रुगानी आणि बालेसी माटुडी देखील पॉझिटीव्ह आढळले होते.

"गेल्या आठवड्यात बरेच लोक माझ्याशी बोलले. पण मी आता ठीक आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या", असे 26 वर्षीयच्या डायबलाने ट्विटरवर म्हटले आहे. इटालियन लीग सेरी-ए संघांनी सोमवारपासून वैयक्तिक प्रशिक्षण सुरू केले आहे. जुव्हेंटसने आपल्या 10 परदेशी खेळाडूंनाही परत बोलावले आहे.