टोकियो - कोरोना व्हायरसमुळे तब्बल चार महिने स्थगित असलेल्या जपानच्या प्रोफेशनल फुटबॉल लीगने (जे-लीग) पुनरागमन केले आहे. जे-लीग शनिवारपासून सुरू करण्यात आली.
या लीगच्या सुरुवातीनंतर 18 संघ मैदानात दाखल झाले. या संघात 9 सामने खेळवण्यात आले. गतविजेत्या योकोहामाचा सामना उरवा रेड्सशी झाला. जे-लीगचा अव्वल विभाग फेब्रुवारीमध्ये केवळ एका फेरीच्या सामन्यानंतर तहकूब करण्यात आला होता. जपानची लोकप्रिय प्रो-बेसबॉल लीगही गेल्या महिन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय पुन्हा सुरू करण्यात आली आहे.