महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ISL-7 : जेतेपदासाठी मुंबई सिटी एफसी-एटीके मोहन बागान यांच्यात आज लढत - आयएसएल २०२१ फायनल

इंडियन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेत आज मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान जेतेपदासाठी भिडणार आहेत.

isl-final-mumbai-city-fc-vs-atk-mohan-bagan
ISL-7 : जेतेपदासाठी मुंबई सिटी एफसी-एटीके मोहन बागान यांच्यात आज लढत

By

Published : Mar 13, 2021, 12:38 PM IST

पणजी - इंडियन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेत आज मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान जेतेपदासाठी भिडणार आहेत. पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबई सिटीला पहिल्यावहिल्या जेतेपदाचे वेध लागले आहे. तर दुसरीकडे गतविजेत्या एटीके मोहन बागानला सलग दुसरे जेतेपद पटकावण्याची संधी आहे. हा सामना फतोर्डा स्टेडियमवर होणार आहे.

दोन्ही संघांनी साखळी फेरीत १२ विजय आणि चार पराभव पत्करले आहेत. उपांत्य फेरीत मुंबई सिटीने एफसी गोवा संघावर पेनल्टी-शूटआऊटमध्ये विजय मिळवत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.

या सामन्याद्वारे टगोल्डन बूट' आणि 'गोल्डन ग्लोव्हज' पुरस्कारांचे मानकरी ठरणार आहेत. मोहन बागानचा आघाडीवीर रॉय कृष्णा आणि एफसी गोव्याचा इगोर अँग्युलो यांनी प्रत्येकी १४ गोल झळकावले आहेत. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यात फिजीच्या कृष्णाला 'गोल्डन बूट' पुरस्कार पटकावण्याची संधी आहे. 'गोल्डन ग्लोव्हज' पुरस्कारासाठी मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग आणि मोहन बागानचा अरिंदम भट्टाचार्य हे शर्यतीत आहेत.

हेही वाचा -भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला कोरोनाची लागण

हेही वाचा -महान फुटबॉलपटू पेले यांनी घेतली कोरोना लस, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details