नवी दिल्ली - कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या व्हायरसचा संचार क्रीडाविश्वातही झाला असून अनेक खेळाडूंना याची लागण झाली आहे. दरम्यान, या व्हायरसमुळे इराकच्या दिग्गज माजी फुटबॉलपटूला आपला जीव गमवावा लागला.
21 एप्रिल 1964 रोजी बगदादमध्ये जन्मलेल्या इराकचे दिग्गज फुटबॉलपटू अहमद राधी यांचे रविवारी निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. इराकच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांना कोरोनो व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त दिले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली.