वॉशिंग्टन - फीफाचे अध्यक्ष जियानी इनफॅनटिनो यांनी विश्व कप क्लीफायरसाठी सर्व खेळाडूंना रिलीज करण्याची मागणी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना केली आहे. तसेच त्यांनी फुटबॉलपटूंना क्वारंटाइनमध्ये सूट देण्याची देखील मागणी केली आहे.
जियानी इनफॅनटिनो यांनी आज बुधवारी सांगितलं की, मी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पत्र लिहून खेळाडूंना क्वारंटाइनमधून सूट देण्यात यावी, यासाठी विनंती केली आहे. यामुळे खेळाडूंना फीफा विश्व कपच्या क्वालीफायरमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यापासून वंचित राहावं लागणार नाही. ब्रिटन सरकारने यूरो 2020 स्पर्धेच्या अंतिम सत्रासाठी जे निर्णय घेतले होते. ते निर्णय आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी लागू करावेत, असा सल्ला मी ब्रिटन सरकारला दिला आहे.
इंग्लिश प्रीमियर लीगने सांगितलं की, ते इंग्लंडच्या रेड लिस्टमध्ये सहभागी देशातील खेळाडूंना विश्व कप क्वालीफायरमध्ये भाग घेण्याची परवानगी देणार नाही. याशिवाय स्पॅनिश क्लबने सांगितलं की, जर त्यांचा कोणता क्लब दक्षिण अमेरिकी संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आपल्या खेळाडूंना सोडण्यासाठी नकार देत असेल तर ते त्यांचे समर्थन करतील.