ज्यूरिख - फिफाने जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय महिला फुटबॉल संघाला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. सध्या भारतीय संघ या क्रमवारीत ५३व्या स्थानी आहे. यापूर्वी, १४ ऑगस्टला जाहीर झालेल्या फिफाच्या क्रमवारीत भारत १४३२ गुणांसह ५५व्या स्थानी होता.
हेही वाचा -मेस्सी-रोनाल्डोचा पाडाव करत लेवंडोवस्कीने पटकावला सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार
भारतीय संघाव्यतिरिक्त व्हेनेझुएलानेही दोन स्थानांची कमाई केली असून ते ५५व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. २१९२ गुणांसह अमेरिका अव्वल स्थानावर आहे. त्यांच्यापाठोपाठ दुसर्या क्रमांकावर जर्मनी, तिसर्या क्रमांकावर फ्रान्स आणि चौथ्या क्रमांकावर नेदरलँड्स आहे. पहिल्या आठ स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. माल्टाने रॅकिंगमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. त्यांना १६ स्थानांचा फायदा झाला आहे.