महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फिफा विश्वकरंडक पात्रता स्पर्धेच्या उर्वरित सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर - भारतीय फुटबॉल लेटेस्ट न्यूज

या स्पर्धेत भारताला अफगाणिस्तान आणि ओमानविरुद्ध उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ १४ नोव्हेंबरला अफगाणिस्तान आणि १९ नोव्हेंबरला ओमान विरूद्ध मस्कट येथे सामना खेळणार आहे.

फिफा विश्वकरंडक पात्रता स्पर्धेच्या उर्वरित सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

By

Published : Nov 6, 2019, 9:40 PM IST

नवी दिल्ली -फिफा विश्वकरंडक पात्रता स्पर्धेच्या उर्वरित सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी बुधवारी २६ सदस्यीय संघाची घोषणा केली.

हेही वाचा -बांगलादेशी खेळाडूंना दिल्लीच्या प्रदूषणाचा फटका, तब्येत बिघडली

या स्पर्धेत भारताला अफगाणिस्तान आणि ओमानविरुद्ध उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ १४ नोव्हेंबरला अफगाणिस्तान आणि १९ नोव्हेंबरला ओमान विरूद्ध मस्कट येथे सामना खेळणार आहे.

इगोर स्टीमाक

फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत शानदार प्रदर्शन करणारा गोलरक्षक धीरज सिंगचा प्रथमच वरिष्ठ संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अमरजीतसिंग आणि बचावपटू अन्वर अली यांनाही संघात बोलावण्यात आले आहे.

भारतीय संघ -

गोलकीपर : गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, धीरज सिंग.

डिफेंडर्स : प्रीतम कोटाल, निशु कुमार, राहुल भेके, अनस एडाथोडिका, नरेन्द्र, आदिल खान, सार्थक गोलूई, सुभाशीष बोस, मंदार राव देसाई.

मिडफील्डर्स :उदांता सिंग, जैकीचंद सिंग, सेमिनलेन डोंगल, रेनियर फर्नांडिस, विनीत राय, सहल अब्दुल समद, प्रणॉय हल्दी, अनिरुद्ध थापा, लालियांजुआला चांगटे, ब्रैंडन फर्नांडेज, आशिक कुरुयन.

फॉरवर्ड्स :सुनील छेत्री, फारुख चौधरी, मानवीर सिंह.

मुख्य प्रशिक्षक : इगोर स्टीमाक.

ABOUT THE AUTHOR

...view details