मुंबई- भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चुन्नी गोस्वामी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज रुग्णालयातच त्यांनी अंतिम श्वास घेतला.
चुन्नी गोस्वामी यांच्या निधनाची बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा सुदिप्तो असा परिवार आहे. गोस्वामी हे १९६२मध्ये अशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने १९६४मध्ये उपविजेतापर्यंत मजल मारली होती. क्लब फुटबॉलमध्ये त्यांनी मोहन बागानचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे, वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.