महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महिला फुटबॉल : भारताने व्हिएतनामला बरोबरीत रोखले - महिला फुटबॉल न्यूज

भारताकडून या सामन्यातील एकमेव गोल रंजना चानूने केला. व्हिएतनामने सामन्याच्या सुरूवातीपासून भारतावर आक्रमण केले.

महिला फुटबॉल : भारताने व्हिएतनामला बरोबरीत रोखले

By

Published : Nov 6, 2019, 8:10 PM IST

नवी दिल्ली - बुधवारी भारतीय महिला फुटबॉल संघाने व्हिएतनामविरुद्ध झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात १-१ ने बरोबरी राखली. यापूर्वी झालेल्या पहिल्या मैत्रीपूर्ण सामन्यात भारताला ३-० ने पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा -बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताच रोहित करणार मोठा विक्रम

भारताकडून या सामन्यातील एकमेव गोल रंजना चानूने केला. व्हिएतनामने सामन्याच्या सुरूवातीपासून भारतावर आक्रमण केले. व्हिएतनामकडून थाई थी थाओने एकमात्र गोल करत संघाला खाते उघडून दिले. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ५७ व्या मिनिटाला रंजना चानूने भारतासाठी गोल झळकावला.

ABOUT THE AUTHOR

...view details