महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फिफाच्या जागतिक क्रमवारीतून भारत 'TOP-१००' मधून बाहेर

भारतीय संघ एएफसी आशियाई चषक स्पर्धेत साखळी फेरीतूनच बाहेर पडल्यामुळे फिफाच्या क्रमवारीत भारताची ६ स्थानांनी घसरण झाली.

भारत वन

By

Published : Feb 9, 2019, 12:00 AM IST

मुंबई- जागतिक फुटबॉल महासंघाच्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ 'TOP-१००' मधून बाहेर पडला आहे. ९७ व्या क्रमांकावरुन १०३ व्या स्थानी भारताची घसरण झाली आहे. भारतीय संघ एएफसी आशियाई चषक स्पर्धेत साखळी फेरीतूनच बाहेर पडल्यामुळे फिफाच्या क्रमवारीत भारताची ६ स्थानांनी घसरण झाली. फिफाच्या क्रमवारीत बेल्जियम अव्वल तर, फ्रान्स, ब्राझील अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.


आशियाई चषक स्पर्धेत भारताला ३ पैकी २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरच्या सामन्यात बहारिनविरुद्ध १-० ने पराभव झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.


माजी प्रशिक्षक कॉन्स्टन्टाइन यांच्या कार्यकाळात भारताने फिफाच्या जागतिक क्रमवारीत १७३ व्या स्थानावरून ९६ व्या झेप घेतली होती. परंतु, भारताला आपल्या कामगिरीत सातत्य राखता न आल्याने क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. भारताला क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details