अहमदाबाद -भारत आणि सीरिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात टाय झाल्याने इंटरकाँटिनेंटल चषकाच्या अंतिम सामन्याचे दरवाजे सीरियासाठी बंद झाले आहेत. आता येत्या शुक्रवारी उत्तर कोरिया आणि ताजिकिस्तान यांच्यात अंतिम सामना होईल.
या टायबरोबरच भारताचीही अंतिम सामन्यात जाण्याची संधी हुकली आहे. भारताने या सामन्यात सीरियाला 6 गोलच्या फरकाने मात दिली असती तर, भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश झाला असता. या सामन्यामध्ये भारताकडून पहिला गोल केला गेला. 18 वर्षीय नरेंदर गेहलोत याने 52 व्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर सीरियाने 77व्या मिनिटाला गोल करत भारताची बरोबरी साधली. मात्र, या गोलनंतर सीरियाला आघाडी घेता आली नाही.