काठमांडू -भारताच्या १८ वर्षाखालील फुटबॉल संघाने सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेत धडाका उडवला आहे. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने मालदीवला पाणी पाजत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
सैफ चॅम्पियनशिप : मालदीवला पाणी पाजत भारत फायनलमध्ये - saff football tournament
सामन्यात भारताने मालदीवला ४-० ने धूळ चारली. सामन्याच्या सुरुवातीपासून भारताने आक्रमक खेळ केला. सातव्या मिनिटाला नरेंद्र गहलोतने केलेल्या हेडरमुळे भारताला आघाडी घेता आली. त्यानंतर, अहनाफ राशीधच्या स्वयंगोलने भारताने ही आघाडी वाढवली.

सामन्याच्या दुसऱ्या सत्रातही भारताने वर्चस्व राखले. ७९ मिनिटाला मानवीर सिंगने आणि ८१ व्या मिनिटाला एन. मेटेईने गोल करत भारताला विजय मिळवून दिला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वृत्तानुसार (एआयएफएफ) भारताचा अंतिम सामना बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे.