नवी दिल्ली - 'फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना कॅरममध्ये मी हरवू शकतो', असे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने म्हटले आहे. 'फुटबॉलशिवाय तुम्ही कोणत्या गेममध्ये रोनाल्डो आणि मेस्सीला हरवू शकता?', असा प्रश्न छेत्रीला ट्विटरवर विचारण्यात आला होता.
सुनील छेत्री म्हणतो 'या' खेळात मी रोनाल्डो-मेस्सीला पाणी पाजू शकतो! - सुनील छेत्री लेटेस्ट न्यूज
भारतीय म्हणून सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक गोल केले आहेत. 'मी आत्मविश्वासाने सांगतो की, हे दोघे कॅरममध्ये वाईट असतील. मला वाटते की मी त्यांना कॅरममध्ये हरवू शकतो', असे छेत्री म्हणाला.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदवण्याच्या विक्रमात छेत्री दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने भारतासाठी ७२ गोल केले आहेत. तर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सी तिसऱया स्थानावर आहे. त्याच्या खात्यात ७० गोल आहे. पोर्तुगालचा फुटबॉलपटू रोनाल्डो या विक्रमात अव्वल स्थानावर विराजमान असून त्याने देशासाठी ९९ गोल केले आहेत.