गोवा - माजी विजेत्या बंगळुरू एफसीचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूला हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या हंगामासाठी 'गोल्डन ग्लोव्ह'चा पुरस्कार देण्यात आला. या हंगामात संधूने १९ सामन्यांत ४९ गोल वाचवले आहेत.
हेही वाचा -आयपीएल पुढे ढकलल्यानंतर चाहत्यांना भेटला धोनी...पाहा व्हिडिओ
प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी संधूने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. परंतु बंगळुरूला अंतिम फेरी गाठता आली नाही. आयएसएलच्या सहाव्या हंगामात एटीकेच्या एरिंदम भट्टाचार्याने २० सामन्यात ५३ गोल वाचवले आहेत.
झेविअर हर्नांडेझच्या सर्वोत्कृष्ट दोन गोलच्या आधारे एटीकेने दोन वेळच्या चॅम्पियन चेन्नईयन एफसीला नमवत आयएसएलच्या सहाव्या हंगामाचे जेतेपद पटकावले. अॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) चेन्नईयन एफसीचा ३-१ पराभव करत तिसऱ्या विजेतेपदाला गवसणी घातली. यापूर्वी २०१४ आणि २०१६ मध्ये एटीकेने जेतेपद पटकावले होते. कोरोनाच्या भीतीमुळे हा सामना गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर प्रेक्षकांविनाच रंगला होता.