महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गुरप्रीतसिंग संधू आणि संजू बाग ठरले यंदाचे सर्वोत्तम फुटबॉलपटू - गुरप्रीतसिंग संधू

एआयएफएफने गुरप्रीतसिंग संधू आणि संजू बाग यांना अनुक्रमे पुरुष व महिला गटात वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित केले. महिलांमध्ये रत्नबाला देवीची उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

Gurpreet singh sandhu and sanju bag elected AIFF's best player of the year
गुरप्रीतसिंग संधू आणि संजू बाग ठरले यंदाचे सर्वोत्तम फुटबॉलपटू

By

Published : Sep 25, 2020, 6:54 PM IST

नवी दिल्ली - अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गुरप्रीतसिंग संधू आणि संजू बाग यांना अनुक्रमे पुरुष व महिला गटात वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित केले. आज शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. गुरप्रीतला हा पुरस्कार प्रथमच प्राप्त होत असून हा पुरस्कार जिंकणारा तो दुसरा गोलकीपर ठरला आहे. यापूर्वी सुब्रत पॉल यांना २००९मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.

गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जिंकलेला गुरप्रीत म्हणाला, "मला हा टप्पा गाठायचा होता आणि हा असा पुरस्कार आहे, जो मला मिळवायचा होता. सुनील छेत्रीने अनेक वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. मी या पुरस्कारासाठी कधी पात्र ठरेन, हा विचार मी नेहमी करायचो.''

महिलांमध्ये संजू बागला सर्वोत्कृष्ट हंगामासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. तर, रत्नबाला देवीची २०१९-२०साठी उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक मेमोव रॉकी यांच्या सल्ल्यानुसार आणि एआयएफएफचे तंत्रज्ञ संचालक इसाक डोरू यांच्या मतानुसार या दोन्ही खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

संजू म्हणाली, "वैयक्तिकरित्या ही माझ्यासाठी मोठी कामगिरी आहे. हा पुरस्कार तुमची मेहनत दर्शवते. संधी आणि प्रेरणा दिल्यासाठी मी एआयएफएफचे आभार मानते.''

ABOUT THE AUTHOR

...view details