मिलान -माजी स्वीडिश फुटबॉल खेळाडू झ्लाटन इब्राहिमोविच इटलीला परतणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. इटालियन सेरी-ए लीगचे संघ मागील आठवड्यापासून प्रशिक्षणात परतले. लीगचे सामने 27 मे ते 2 जून दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व फुटबॉल उपक्रम मार्चपासून बंद झाले असून अधिकारी रिकाम्या स्टेडियममध्ये हा हंगाम पूर्ण करण्याच्या विचारात आहेत.
दिग्गज खेळाडू झ्लाटन इब्राहिमोविच इटलीला परतणार - zlatan ibrahimovic latest news
पुढील महिन्यात एसी मिलानबरोबर इब्राहिमोविचचा करार संपुष्टात येत आहे. त्यामुळे सेरी-ए अधिकाऱ्यांकडून 'ग्रीन सिग्नल' मिळाल्यानंतर तो उर्वरित सामने खेळणार आहे. जुव्हेंटस स्टार रोनाल्डोसुद्धा इटलीत दाखल झाला आहे. एका वृत्तानुसार, एसी मिलाननंतर इब्राहिमोविच स्वीडनचा फुटबॉल क्लब हम्मरहबायमध्ये जाऊ शकतो.

1999 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा इब्राहिमोविच मालमा, अजॅक्स, जुव्हेंटस, इंटर मिलान, बार्सिलोना, एसी मिलान, पीएसजी आणि मँचेस्टर युनायटेड यासारख्या क्लबकडून खेळला आहे. त्यानंतर 2018 मध्ये तो मेजर लीग सॉकर खेळण्यासाठी अमेरिकेत गेला होता.