कोची -पूर्व बंगाल आणि मोहन बागान क्लबचे माजी फुटबॉलपटू आर. धनराजन यांचे निधन झाले आहे. ते ३९ वर्षाचे होते. केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील पेरिथलमन्ना येथे फुटबॉलचा सामना खेळत असताना रविवारी रात्री धनराजन यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
केरळमध्ये सामना खेळताना फुटबॉलपटूचा मृत्यू - आर .धनराजन न्यूज
एफसी पेरिथलमन्ना आणि सास्था थ्रिसूर यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ही घटना २७ व्या मिनिटाला घडली. सामना खेळत असताना धनराजन यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक जमिनीवर कोसळले.
केरळमध्ये सामना खेळताना फुटबॉलपटूचा मृत्यू
हेही वाचा -निखत मेरीसारखी बनू शकते - किरेन रिजिजू
एफसी पेरिथलमन्ना आणि सास्था थ्रिसूर यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ही घटना २७ व्या मिनिटाला घडली. सामना खेळत असताना धनराजन यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक जमिनीवर कोसळले. धनराजन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतोष ट्रॉफीमध्ये धनराजन यांनी पूर्व बंगालचे प्रतिनिधित्व केले होते.