नवी दिल्ली -भारताचे दिग्गज माजी फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. १९६२ च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे बॅनर्जी हे सदस्य होते. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते.
भारताचे दिग्गज माजी फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी यांचे निधन - प्रदीप कुमार बॅनर्जी लेटेस्ट न्यूज
भारताचे दिग्गज माजी फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियाने त्रस्त होते. त्यांनी देशाकडून ८४ सामन्यांत ६५ गोल केले आहेत.
हेही वाचा -कोरोना असला तरी आयपीएलमध्ये खेळणार 'हा' दिग्गज फलंदाज
जागतिक फुटबॉल संघटनेने (FIFA) गौरव केलेल्या बॅनर्जीं यांचा ३ जून १९३६ मध्ये पश्चिम बंगाल येथील जलपैगूरी येथे जन्म झाला. त्यांनी देशाकडून ८४ सामन्यांत ६५ गोल केले आहेत. १९६०च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत बॅनर्जी यांनी भारतीच संघाचे नेतृत्व केले होते. १९६२ शिवाय, १९९२ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. फिफाने २००४ मध्ये त्यांना 'ऑर्डर ऑफ मेरिट'ने सन्मानित केले आहे.