कोलकाता -भारतीय फुटबॉल संघ आणि मोहन बागानचे माजी फुटबॉलपटू प्रणब गांगुली यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
प्रणब गांगुली यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. शुक्रवारी त्यांनी पार्क सर्कस परिसरात असलेल्या राहत्या घरी अंतिम श्वास घेतला.
गांगुली १९६९ मध्ये मर्डेका कपमध्ये सहभागी भारतीय संघाचे सदस्य होते. ते सलग आठ हंगाम मोहन बागानकडून फुटबॉल खेळले आहेत.
गांगुली यांनी १९६९ मध्ये झालेल्या आयएफए शील्ड स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च प्रदर्शन केलं. त्यांनी या सामन्यात दोन गोल केले. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर मोहन बागानने पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालचा ३-१ ने पराभव करत विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा -बार्सिलोनाचे विक्रमी जेतेपद, ३१व्यांदा जिंकला कोपा डेल रे कप
हेही वाचा -ISL-७ : एटीके मोहन बागानचा पराभव करत मुंबई सिटी एफसीने पटकावले जेतेपद