महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

72 दिवस अडकला एअरपोर्टवर, तरीही घानाच्या फुटबॉलरला राहायचंय भारतातच, कारण... - Footballer Randy Juan Muller stuck in mumbai airport

म्युलर केरळमधील स्पोर्ट्स क्लब खेळण्यासाठी भारतात आला होता. विमानतळावर अडीच महिने घालवल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घेतली. युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य राहुल कनल यांनी या फुटबॉलर म्युलरला विमानतळावरून वांद्रे येथील हॉटेलमध्ये नेले.

Footballer Randy Juan Muller
रॅन्डी जुआन म्युलर

By

Published : Jun 6, 2020, 9:59 PM IST

Updated : Jun 6, 2020, 10:40 PM IST

72 दिवस अडकला एअरपोर्टवर, तरीही घानाच्या फुटबॉलरला राहायचंय भारतातच, कारण...

मुंबई- घाना येथील 23 वर्षीय फुटबॉलर, रॅन्डी जुआन म्युलर याला सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द केल्यावर 72 दिवस मुंबई विमानतळावर घालवावे लागले. 72 दिवस मुंबई विमानतळावर राहूनही खेळायची संधी मिळाल्यास भारतातच राहण्याची इच्छा रॅन्डी जुआन म्युलरने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

ई टीव्ही भारत प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी फुटबॉलर रॅन्डी जुआन म्युलर यांच्यासोबत केलेली बातचीत

केरळमधील स्पोर्टस क्लबमध्ये खेळण्यासाठी आला होता भारतात -

म्युलर केरळमधील स्पोर्ट्स क्लब खेळण्यासाठी भारतात आला होता. विमानतळावर अडीच महिने घालवल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घेतली. युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य राहुल कनल यांनी या फुटबॉलर म्युलरला विमानतळावरून वांद्रे येथील हॉटेलमध्ये नेले. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद झाल्याने 21 मार्चपासून तो मुंबई विमानतळावर राहत होता. केरळमधील ओआरपीसी स्पोर्ट्स क्लबकडून खेळण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये हा फुटबॉलर भारतात आला होता, तो फक्त सहा महिन्यांच्या व्हिसावर.

प्रत्येक सामन्यात फक्त 2 ते 3 हजार रुपये मानधन मिळतात. मी सामन्यात क्वचितच खेळलो होतो. मात्र, व्हिसा आणि तिकिटांसाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च केले आणि हा प्रसंग ओढवून घेतल्याचे म्युलर यांनी सांगितले. भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर, मी घरी परत जाण्याचा प्लँन केला. केनियामार्गे घानाच्या प्रवासासाठी 30 मार्च रोजी विमानाचे तिकीटही विकत घेतले. पण, मी परत येण्यापूर्वी सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आणि मी येथे अडकलो असल्याचे म्युलर याने सांगितले.

72 दिवस घालवले एअरपोर्टवर तरीही घानाच्या फुटबॉलरची भारतात राहण्याची तयारी

म्युलरने तब्बल 72 दिवस काढले मुंबई विमानतळावर -

शयनगृह सापडले नाही म्हणून अंधेरी पोलिसांनी त्याला विमानतळावर जाण्यास सांगितले. सीआयएसएफ, हाऊसकीपिंग आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या मदतीने त्याने मुंबई विमानतळावर 72 दिवस वास्तव्य केले. भारतात मला पराठे आणि बिर्याणी हे जेवण आवडते. माझ्या घरच्यांशी मी सतत फोनवरून संपर्क करतो. विमानतळ परिसरात मी रोज 1 तास वॉक करून फिटनेस मेंटेन केले. तर मला सीआयएसएफ, विमानतळावरील कर्मचारी यांनी खूप मदत केली. तसेच राहुल कनल व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सलाम ठोकून म्युलने त्यांचे आभार मानले.

फुटबॉलर रॅन्डी जुआन म्युलर लॉकडाऊनमुळे 72 दिवसांपासून मुंबई एअरपोर्टवरच...

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचले म्युलरचे ट्विट -

अनेक प्रवाशांनी म्युलर याला पाहिले आणि त्याला भोजन, पैसे आणि पुस्तकेही दिली. प्रवाशांपैकी एकाने मला 'बी यूअर ओन थेरपिस्ट' नावाचे पुस्तक दिले. विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाने त्याला आपला फोन देऊन ट्विटरवरून मदत मागण्यास सांगितले. म्युलर याने केलेले ट्विट अखेर युवासेना अध्यक्ष व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहिले. आदित्य ठाकरे यांनी युवासेनेला त्याला हॉटेलमध्ये हलविण्याचे निर्देश दिले. घनियान फुटबॉलर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकला होता. मी एअरपोर्टवर जेव्हा त्याला भेटलो तेव्हा त्याला आनंदाश्रू अनावर झाले. आदित्य ठाकरे यांनी मला त्याची मदत करण्याची संधी दिली. त्यानंतर आम्ही त्याला वांद्रे येथील हॉटेलमध्ये नेले. त्याला परत त्याच्या देशात नेण्यासाठी प्रयत्न सुरू असून सर्व खर्च देखील आम्ही करणार आहोत, असे सांगत राहुल कनल यांनी आदित्य ठाकरे यांचेदेखील आभार मानलेत.

फुटबॉलर रॅन्डी जुआन म्युलर लॉकडाऊनमुळे 72 दिवसांपासून मुंबई एअरपोर्टवरच...
Last Updated : Jun 6, 2020, 10:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details