बार्सिलोना - पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) आणि ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारला न्यायालयाने मोठा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने नेमारला त्याचा माजी क्लब एफसी बार्सिलोनाला 6.7 दशलक्ष युरो (57,13,15,700 रुपये) देण्याचे आदेश दिले. न भरलेल्या स्वाक्षरी बोनससंदर्भातील प्रकरण हरल्यानंतर नेमारला हा आदेश देण्यात आला.
बार्सिलोना सोडून नेमार 2017 मध्ये पीएसजीमध्ये सामील झाला आणि त्यासाठी त्याने 22.2 दशलक्ष युरोच्या जागतिक विक्रमाच्या मानधनावर स्वाक्षरी केली. 43.6 दशलक्षच्या लॉयल्टी बोनसच्या देयकासाठी त्याने बार्सिलोनाविरूद्ध दावा दाखल केला.