लंडन - फुटबॉलविश्वातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी पोर्तुगाल फुटबॉल असोसिएशनने याची पुष्टी केली. एका वृत्तपत्रानुसार, पाचवेळा 'बलोन डी ओर' पुरस्कार जिंकणारा रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर क्वारंटाइन झाला आहे.
फुटबॉलस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण - ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना न्यूज
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू आणि जुव्हेंटसकडून खेळणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. वृत्तानुसार, रोनाल्डोला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.
फुटबॉलस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण
कोरोनाच्या संसर्गामुळे रोनाल्डो आता नेशन्स लीगमध्ये होणाऱ्या स्वीडनविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. हा सामना बुधवारी होणार आहे. नेशन्स लीगमध्ये रोनाल्डो स्पेन आणि फ्रान्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. मैत्रीपूर्ण सामन्यात तो अनेक खेळाडूंच्या संपर्कात आला होता. वृत्तानुसार, रोनाल्डोला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.