नवी दिल्ली - दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची दुसरी कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली. या चाचणीमुळे तो चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. मात्र याबाबतचे अधिकृत वृत्त समोर आलेले नाही.
ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह - ronaldo second corona test
३५ वर्षीय रोनाल्डो विलगीकरणात आहे. लिस्बन येथे स्वीडनविरुद्धच्या संघाच्या नेशन्स लीग सामन्याच्या दोन दिवस आधी रोनाल्डो पॉझिटिव्ह आढळला.
तत्पूर्वी, ३५ वर्षीय रोनाल्डो विलगीकरणात आहे. लिस्बन येथे स्वीडनविरुद्धच्या संघाच्या नेशन्स लीग सामन्याच्या दोन दिवस आधी रोनाल्डो पॉझिटिव्ह आढळला. यूएफा नियमांनुसार, बार्सिलोनाविरुद्धच्या सामन्याच्या २४ तासांपूर्वी रोनाल्डोची चाचणी निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. २८ ऑक्टोबरला जुव्हेंटसचा सामना बार्सिलोनाशी होणार आहे.
नेशन्स लीगमध्ये रोनाल्डो स्पेन आणि फ्रान्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. मैत्रीपूर्ण सामन्यात तो अनेक खेळाडूंच्या संपर्कात आला होता. वृत्तानुसार, रोनाल्डोला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.