नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मिझोरमची राजधानी एझवाल येथे होणाऱ्या हीरो संतोष ट्रॉफी (फुटबॉल) २०१९-२० स्पर्धेची अंतिम फेरी पुढे ढकलण्यात आली आहे. कोविड-१९ बाबत सरकारने सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या सर्व राज्य संघटनांना याची माहिती दिली आहे.
हेही वाचा -विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हवाय धोनीसारखा खेळाडू!
यापूर्वी, अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेचा २९ वा हंगाम एप्रिलऐवजी सप्टेंबरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोजकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अझलन शाह चषक ११ ते १८ एप्रिल दरम्यान मलेशियाच्या इपोह येथे होणार होता, परंतु आता २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे बर्याच क्रीडा स्पर्धा यापूर्वी रद्द, स्थगित किंवा हस्तांतरित केल्या गेल्या आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत ४००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १.१४ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.