महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

FIFA Women’s World Cup: अमेरिकेच्या महिला संघाचा दबदबा कायम; जिंकली चौथ्यांदा स्पर्धा - United States

फिफा महिला विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकेकडून दिग्गज खेळाडू मेगन रेपिनो आणि रोज लावेल्ले यांनी गोल केले. रेपिनो हिने पेनाल्टीवर तर लावेले हिने फिल्डवर गोल केला.

FIFA Women’s World Cup: अमेरिकेच्या महिला संघाचा दबदबा कायम; जिंकली चौथ्यांदा स्पर्धा

By

Published : Jul 7, 2019, 11:59 PM IST

फ्रान्स - अमेरिकेच्या महिला संघाने फुलबॉलमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. अमेरिकेने सलग चौथ्यांदा फिफा महिला विश्वकप स्पर्धा जिंकली असून आज रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेने युरोपीयन चॅम्पीयन नेदरलँडचा 2-0 ने पराभव केला. या विजयासह अमेरिकेचा महिला संघ सलग चौथ्यांदा विश्वविजेता ठरला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या महिला संघाने 1991, 1999, आणि 2015 मध्ये विश्वकप जिंकला होता.

फिफा महिला विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकेकडून दिग्गज खेळाडू मेगन रेपिनो आणि रोज लावेल्ले यांनी गोल केले. रेपिनो हिने पेनाल्टीवर तर लावेले हिने फिल्डवर गोल केला.

सामन्यामध्ये पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघात कडवी टक्कर पाहायला मिळाली. नेदरलँडच्या महिला संघाने योजनाबद्ध खेळ करत अमेरिकेच्या महिला संघाला गोल करण्याची संघी दिली नाही. मात्र अमेरिकेनेही अनेकवेळा चेंडूवर ताबा मिळवत आक्रमण केले. यामध्ये त्यांना यश मिळाले नाही.

दुसऱ्या हाफमध्ये अमेरिकेने सामन्याचे चित्र पालटले. अमेरिकेने आक्रमणाचा धडाका लावत नेदरलँडची बचाव फळी भेदली. याचा फायदा अमेरिकेला झाला. तेव्हा अमेरिकेने 61 व्या मिनिटाला पेनल्टीची संधी मिळाली. या संधीचे सोने करत रेपिनो हिने अमेरिकेला सामन्यात बढत मिळवून दिली. यानंतर आठ मिनिटातच अमेरिकेने पुन्हा आक्रमण करत गोल केला.

संपूर्ण स्पर्धेत 6 गोल करणाऱ्या अमेरिकेची खेळाडू रेपिनो हिला गोल्डन बूटने सन्मानित करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details