नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलल्यानंतर फुटबॉल विश्वाची जागतिक संघटना फिफाने खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फिफाने टोकियो ऑलिम्पिकसाठी फुटबॉलपटूंसाठी वयोमर्यादा वाढविली आहे. आता १ जानेवारी १९९७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले फुटबॉलपटू ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकतील.
टोकियो ऑलिम्पिकसाठी फिफाने वाढवली वयोमर्यादा - फिफाने खेळाडूंची वाढवली वयोमर्यादा न्यूज
फिफाने टोकियो ऑलिम्पिकसाठी फुटबॉलपटूंसाठी वयोमर्यादा वाढविली आहे. आता १ जानेवारी १९९७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले फुटबॉलपटू ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकतील.
![टोकियो ऑलिम्पिकसाठी फिफाने वाढवली वयोमर्यादा FIFA increases the age limit of footballers due to postponement of Olympics](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6672200-thumbnail-3x2-aaa.jpg)
यासोबतच फिफाने कोरोना व्हायरसमुळे नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी १७ वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा तहकूब करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयासोबतच, कार्यकारी गटाने २० वर्षाखालील महिला विश्वकरंडक स्पर्धा (पनामा-कोस्टा रिका) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा यंदा ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान होणार होती.
यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या स्पर्धांच्या नवीन तारखांची घोषणा झाली असून स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑलिम्पिक स्पर्धा आता २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या काळात होणार आहेत. तर पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान आयोजित केल्या जातील.