नवी दिल्ली -यंदाचा फिफा फिफा'वुमन ऑफ द इयर' पुरस्कार अमेरिकेच्या मेघन रॅपिनो हिने जिंकला. या पुरस्कारामुळे तिचे जगभरातून कौतूक होत आहे. स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना संघाने या महिला खेळाडूसाठी एक इच्छा व्यक्त केली आहे. बार्सिलोना मेघनला आपल्या संघात सामील करण्यास खुप उत्सुक आहे.
हेही वाचा -सिंधूच्या प्रशिक्षकाने 'या' कारणामुळे दिला राजीनामा
२०१५ मध्ये व्यावसायिक संघाचा दर्जा प्राप्त केल्यानंतर बार्सिलोनाने आपल्या महिला संघावर विचार विनिमय केला. त्यामुळे ते मेघनला आपल्या संघात सामील करुन घेण्यास उत्सुक आहेत. संघाचे निर्देशक मारिया टिक्सीडोर म्हणाल्या, 'आम्हाला वाटते की अशा खेळाडूंसोबत आम्ही करार करण्यास तयार आहोत.
जुलैमध्ये मेघनने अमेरिकेला महिला विश्वचषक मिळवून दिला होता. तिने या स्पर्धेत सहा गोल झळकावले होते. तिच्या या कामगिरीमुळे तिला गोल्डन बुट आणि गोल्डन बॉलने गौरवण्यात आले होते. इटलीच्या मिलान येथे यंदाच्या फिफा फुटबॉल पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फिफा 'बेस्ट प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीसोबत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. मात्र, या स्पर्धेत मेस्सीने बाजी मारत सहाव्यांदा हा पुरस्कार आपल्या खिशात घातला. तर, महिला खेळाडूंमध्ये मेघन रॅपिनो हिने पहिल्यांदा फिफा 'वुमन ऑफ द इयर' चा पुरस्कार जिंकला आहे.