महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

एफसी गोव्याचा फुटबॉलपटू इगोर अंगुलोची ईटीव्ही भारतशी बातचीत - Igor Angulo on latest win

स्ट्रायकर फेरान कोरोमिनासची जागा भरून काढत इगोर स्पर्धेत मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. ईटीव्ही भारतशी बातचीत करताना इगोरने बंगळुरू एफसीविरुद्धच्या त्याच्या गोलविषयी, स्ट्रायकर म्हणून त्याच्या जबाबदारी आणि मुंबई एफसीविरूद्धच्या आगामी सामन्याबद्दल भाष्य केले.

EXCLUSIVE: Goa will take down Mumbai FC tonight, says striker Angulo
एफसी गोव्याचा फुटबॉलपटू इगोर अंगुलोची ईटीव्ही भारतशी बातचीत

By

Published : Nov 25, 2020, 5:57 PM IST

मुंबई -इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी गोवाने बंगळुरू एफसीविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली. स्पेनचा फुटबॉलपटू इगोर अंगुलोने केवळ तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करत गोवा संघाला पराभवापासून वाचवले.

स्ट्रायकर फेरान कोरोमिनासची जागा भरून काढत इगोर स्पर्धेत मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. ईटीव्ही भारतशी बातचीत करताना इगोरने बंगळुरू एफसीविरुद्धच्या त्याच्या गोलविषयी, स्ट्रायकर म्हणून त्याच्या जबाबदारी आणि मुंबई एफसीविरूद्धच्या आगामी सामन्याबद्दल भाष्य केले.

  • प्रश्न - तू दोन गोल नोंदवून गोव्याला पराभवापासून वाचवलेस. तू तुझ्या छातीचा उपयोग करून बंगळुरूविरुद्ध गोल केलास. तो योगायोगाने घडला की तशी रणनिती होती?

उत्तर -बॉल ज्या उंचीवर माझ्यापर्यंत पोहोचला, त्या उंचीमुळे माझी छाती वापरणे सर्वात सुरक्षित होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन गोलमुळे संघाला महत्त्वपूर्ण गुण मिळवण्यात मदत झाली.

  • प्रश्न - इंझागीप्रमाणे बचावात्मक खेळण्याच्या तुझ्या सवयीबद्दल सांग?

उत्तर -मला वाटते की हा बचावात्मक खेळ संभ्रम निर्माण करतो आणि आपण त्याचा फायदा घेऊ शकतो.

  • प्रश्न - स्ट्रायकर म्हणून संघातील जबाबदारी कोणती आणि तू संघाला पुढे कसे घेऊन जाऊ शकतोस?

उत्तर - संघातील प्रत्येकाला आपले सर्वोत्तम काम करावे लागेल. स्ट्रायकर म्हणून माझी भूमिका म्हणजे संधी तयार करणे, मदत करणे आणि गोल करणे ही आहे. यासाठी मी नेहमीच खूप कष्ट करतो.

  • प्रश्न - आज मुंबई एफसी विरुद्धही मोठा सामना आहे. या सामन्यासाठी तुम्ही काय रणनिती आखली आहे?

उत्तर - जिंकण हे आमचे ध्येय आहे. आम्हाला माहित आहे, की या हंगामात त्यांनी खूप स्पर्धात्मक संघ बनवला आहे, परंतु त्यांचा पराभव करण्यासाठी आमच्याकडे चांगली फळी आहे.

  • प्रश्न - तू तुझ्या वैयक्तिक प्रशिक्षणाबद्दल सांग. तू याबद्दल आनंदी आहेस का?

उत्तर - मी आनंदी आहे. मला असे वाटते की सर्व काही योग्य मार्गाने घडत आहे. अर्थात, आमच्याकडे नवीन प्रशिक्षक कर्मचारी असलेला एक नवीन संघ आहे. आम्ही आधीच खूप स्पर्धात्मक आहोत आणि नजीकच्या काळातही अधिक असू.

  • प्रश्न - बायो-बबलमध्ये राहणे आणि बाहेर येऊन कामगिरी करणे किती अवघड आहे? तू याचा सामना कसा केलास?

उत्तर -हे खूप कठीण आहे. परंतु सर्व खेळाडू आणि संघांसाठी ते सारखेच आहे. आम्हाला ते स्वीकारले पाहिजे. या हंगामात अशी मनस्थिती असणे ही यशाची गुरुकिल्ली असू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details