बुखारेस्ट- स्वित्झर्लंडने विश्वविजेता फ्रान्सचा पराभव करत त्यांना यूरो कप २०२० मधूनबाहेर केलं. स्वित्झर्लंडने पेनाल्टी शूटऑउटमध्ये फ्रान्सचा ५-४ ने धुव्वा उडवला. या विजयासह स्वित्झर्लंडने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
राउंड ऑफ १६ मधील तिसरा सामना स्वित्झर्लंड आणि विश्वविजेता संघ फ्रान्स यांच्यात झाला. मूळ वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ गोल केल्याने अधिकचा वेळ देण्यात आला. परंतु या दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. तेव्हा हा सामना पेनाल्टी शूटऑऊटमध्ये गेला. यात स्वित्झर्लंडने ५-४ ने बाजी मारली.
फ्रान्सकडून करीम बेंजेमा याने ५७व्या आणि ५९ व्या मिनिटाला गोल केला. तर पॉल पोग्बा याने ७५ व्या मिनिटाला चेंडू गोलपेस्टमध्ये ढकलला. स्वित्झर्लंडकडून हॅरिस सेफरोविच याने १५व्या आणि ८१ व्या मिनिटाला गोल केला. परंतु ९०व्या मिनिटाला मारियो गॅवरेनोविच याने गोल करत स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली होती.