ग्लासगो - यूरो कप २०२० स्पर्धेत सोमवारी दोन अप्रतिम गोल पाहायला मिळाले. या गोलपैकी एक गोल तर युरो चषकाच्या इतिहासातील अप्रतिम गोल्सपैकी एक ठरला. कारण हा गोल चक्क मैदानाच्या मध्यातून झाल्याने, याची चर्चा सोशल मीडियावर जोरात रंगली आहे.
चेक प्रजासत्ताक आणि स्कॉटलंड यांच्यात सोमवारी सामना पार पडला. या सामन्यात चेक प्रजासत्ताकने स्कॉटलंडवर २-० ने विजय मिळवला. हे दोन्ही गोल चेकचा फॉरवर्ड प्लेयर पॅट्रिक शिक याने केले. सामन्यातील ४२ व्या मिनिटाला शिकने व्लादिमिर कुफॉलच्या क्रॉसवर पहिला गोल नोंदवला. त्यानंतर दुसरा हाफमध्ये चेककडून ७ मिनिटाच्या आतच शिकने अद्भुत गोल करत संघाला २-० ची आघाडी मिळवून दिली.
४५ मीटर दूरवरुन लगावला गोल