म्यूनिख - यूरो कप २०२० स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रमुख दावेदार इटली संघाची विजयी घौडदौड सुरूच आहे. इटलीने उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा २-१ ने पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. इटलीसाठी निकोलो बारेला आणि लोरेंजो इंसिने याने गोल केले. तर लियोनार्डो स्पिनाजोला याने दुसऱ्या हाफमध्ये बेल्जियमसाठी एक गोल वाचवला. इटलीने सलग ३२ सामन्यात विजय मिळवला आहे.
बेल्जियमकडून एकमात्र गोल पहिल्या हाफच्या अखेरीस रोमेलू लुकाकू याने केला. दुसऱ्या हाफमध्ये बेल्जियमला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या परंतु, इटलीच्या डिफेंडर यांनी त्यांना गोल करू दिला नाही. उपांत्य फेरीत इटलीची गाठ स्पेनशी होणार आहे. हा सामना उद्या मंगळवारी (४ जूलै) वेम्बले स्टेडियमध्ये रंगणार आहे. दरम्यान, स्पेनने स्वित्झर्लंडचा पेनाल्टी शूटआउटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
स्पेन विरुद्ध स्वित्झर्लंड पेनाल्टी शूटआउटचा थरार...