लंडन -इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ही लीग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर, लीगने जूनमध्ये मैदानात परतण्याचा निर्णय घेतला.
इंग्लिश प्रीमियर लीगमधील सहा जणांना कोरोनाची लागण - epl coronavirus cases news
“प्रीमियर लीगने आज याची पुष्टी केली, की रविवारी 17 आणि 18 मे रोजी एकूण 748 खेळाडू आणि क्लब स्टाफची चाचणी घेण्यात आली. यामध्ये तीन क्लबमधील सहाजणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संक्रमित आढळलेले खेळाडू आणि क्लब कर्मचारी आता सात दिवसांसाठी क्वारंटाईन असणार आहेत. खेळाडू आणि क्लबची नावे जाहीर केली जाणार नाहीत”, असे लीगने एका निवेदनात म्हटले आहे.
![इंग्लिश प्रीमियर लीगमधील सहा जणांना कोरोनाची लागण english premier league confirms 6 coronavirus positive cases from 3 clubs](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7268986-408-7268986-1589939706399.jpg)
इंग्लिश प्रीमियर लीगमधील सहा जणांना कोरोनाची लागण
“प्रीमियर लीगने मंगळवारी याची पुष्टी केली, की रविवारी 17 आणि 18 मे रोजी एकूण 748 खेळाडू आणि क्लब स्टाफची चाचणी घेण्यात आली. यामध्ये तीन क्लबमधील सहाजणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संक्रमित आढळलेले खेळाडू आणि क्लब कर्मचारी आता सात दिवसांसाठी क्वारंटाईन असणार आहेत. खेळाडू आणि क्लबची नावे जाहीर केली जाणार नाहीत”, असे लीगने एका निवेदनात म्हटले आहे.
प्रीमियर लीगचे क्लब मंगळवारी छोट्या गटातील प्रशिक्षणसाठी तयार झाले होते.