लंडन -इंग्लिश फुटबॉल लीगमधील (ईएफएल) नुकत्याच झालेल्या कोरोनाच्या चाचणीमध्ये 17 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. चॅम्पियनशिपच्या आठ क्लबमधील 10 तर, लीग-2च्या तीन क्लबमधील सात लोक पॉझिटिव्ह आढळल्याचे ईएफएलने रविवारी सांगितले.
इंग्लिश फुटबॉल लीगचे 17 जण कोरोना पॉझिटिव्ह
ईएफएलने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती दिली. 28 आणि 29 मेला 24 क्लबमधील 1058 जणांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. पुढच्या महिन्यात ईएफएल लीग सुरू होण्याची अपेक्षा आहे.
ईएफएलने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती दिली. 28 आणि 29 मेला 24 क्लबमधील 1058 जणांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. पुढच्या महिन्यात ईएफएल लीग सुरू होण्याची अपेक्षा आहे.
इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) 17 जूनपासून पुन्हा सुरू होईल. पहिला सामना अॅस्टन व्हिला आणि शेफील्ड युनायटेड आणि दुसरा सामना मँचेस्टर सिटी आणि अर्सेनल यांच्यात होईल. एक वृत्तसंस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. तर, इटलीची फुटबॉल लीग सेरी-ए 20 जूनपासून सुरू होईल. इटलीच्या सरकारने लीग पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.