लंडन - इंग्लिश चॅम्पियनशिप संघ लीड्स युनायटेडने अल-कायदाचा माजी म्होरक्या ओसामा बिन लादेनचा कार्डबोर्ड कट-आउट एलँड रोड स्टेडियमवरील स्टँडमधून हटवला आहे. एका वृत्तानुसार, कोरोनाव्हायरसमुळे चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत, फुटबॉल क्लबने आपल्या प्रेक्षकांना ऑफर दिली होती, की ते स्टेडियममध्ये कट-आउट लावण्यासाठी अर्ज करू शकतात.
फुटबॉल स्टेडियममध्ये दिसला ओसामा बिन लादेन! - फुटबॉल स्टेडियममध्ये लादेनचा कटआउट
अल-कायदाचा माजी म्होरक्या ओसामा बिन लादेनचा कार्डबोर्ड कट-आउट एलँड रोड स्टेडियमवरील स्टँडमध्ये पाहायला मिळाला. फुटबॉल क्लब लीड्स युनायटेडने आपल्या प्रेक्षकांना ऑफर दिली होती की ते स्टेडियममध्ये कट-आउट लावण्यासाठी अर्ज करू शकतात.
या निर्णयानंतर, एका फुटबॉल चाहत्याने प्रँक करताना ओसामा बिन लादेनचा कट-आउट पाठवला. त्यानंतर आयोजकांनीही तो आसनावर चिकटवला. त्यानंतर हा कट-आउट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आगामी फुलहॅमविरुद्धच्या सामन्यापूर्वी स्टेडियमच्या स्टँडवर असे कोणतेही फोटो नसतील याची खात्री करणार असल्याने लीड्सने सांगितले आहे.
अमेरिकन नेव्ही सील्सने 2011 मध्ये लष्करी कारवाईद्वारे लादेनचा खात्मा केला होता. 2001 मध्ये ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर 9/11 चा दहशतवादी हल्ला केला. यात तब्बल 3000 लोकं मरण पावले होते. लादेनला ठार केल्यानंतर अल-कायदाची सूत्रे त्याचा मुलगा हामजा बिन लादेनकडे होती. ओसामाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हमजा अमेरिका आणि अन्य देशांवर हल्ले करण्याची शक्यता होती. मात्र, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात हमजा बिन लादेन हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांनी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले होते.