लंडन -विश्वकरंडक जिंकणार्या इंग्लंड फुटबॉल संघाचे सदस्य असलेले मार्टिन पीटर्स यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या कुटुंबियांनी याबाबत माहिती दिली. पीटर्स हे १९६६ मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेत्या इंग्लंड संघाचे भाग होते. इंग्लंडने अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते.
इंग्लंडच्या विश्वकरंडक विजेत्या फुटबॉल संघाचे सदस्य मार्टिन पीटर्स यांचे निधन - मार्टिन पीटर्स लेटेस्ट न्यूज
'१९६६ सालच्या विश्वचषक विजेत्या संघाच्या सदस्याचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले', अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
विश्वकरंडक विजेत्या इंग्लंड संघाचे सदस्य मार्टिन पीटर्स यांचे निधन
हेही वाचा -BBL 2019 : केकेआरने 'रिलीज' केलेल्या ख्रिस लिनने झोडपल्या इतक्या धावा
'१९६६ सालच्या विश्वचषक विजेत्या संघाच्या सदस्याचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले', अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. पीटर्स वयाच्या १५ व्या वर्षी वेस्ट हॅममध्ये सामील झाले होते. त्यानंतर तेथे ११ वर्षे खेळल्यानंतर १९७७ मध्ये ते टॉटेनहॅम हॉटस्पूरमध्ये सामील झाले होते.