महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंडच्या कर्णधाराची कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उडी - harry kane corona donation news

केन म्हणाला, “माझा जन्म स्टेडियमपासून काही मैलांच्या अंतरावर झाला. या क्लबने मला कारकिर्दीची व्यावसायिक सुरूवात मिळवून दिली. त्यामुळे आता परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे.'' या शर्टच्या पुढील भागावर देशातील आरोग्य कर्मचार्‍यांसाठी आभार प्रदर्शनाचा एक संदेश आहे. टी-शर्टच्या सर्व विक्रीचा 10 टक्के निधी चॅरिटीकडे जाईल.

England football captain harry kane will sponsor the shirt
इंग्लंडचा कर्णधाराची कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उडी

By

Published : May 16, 2020, 12:27 PM IST

लंडन -इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार आणि इंग्लिश क्लब टॉटेनहॅम हॉस्टपरचा स्टार खेळाडू हॅरी केनने 2020-21 फुटबॉल हंगामासाठी लॅटिन ओरिएंटचे शर्ट प्रायोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युवा असताना केनने लॅटिन ओरिएंट येथे कर्जासाठी पाच महिने घालवले होते. या क्लबसाठी त्याने 18 सामन्यांत 5 गोल केले आहेत.

केन म्हणाला, “माझा जन्म स्टेडियमपासून काही मैलांच्या अंतरावर झाला. या क्लबने मला कारकिर्दीची व्यावसायिक सुरूवात मिळवून दिली. त्यामुळे आता परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे.'' या शर्टच्या पुढील भागावर देशातील आरोग्य कर्मचार्‍यांसाठी आभार प्रदर्शनाचा एक संदेश आहे. टी-शर्टच्या सर्व विक्रीचा 10 टक्के निधी चॅरिटीकडे जाईल.

लॅटिन ओरिएंटची प्रमुख डेन्नी मॅकलिन म्हणाल्या, "या साथीच्या काळात कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेबद्दल आम्ही सर्व नायकांचे आभार मानू इच्छितो. या समर्थनाबद्दल हॅरीचे आभार. तुम्ही आधुनिक खेळाचे खरे आदर्श आहात.''

ABOUT THE AUTHOR

...view details