लंडन -इंग्लिश प्रीमियर लीगच्या १२व्या फेरीच्या चाचणीनंतर ८ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रीमियर लीगने याची पुष्टी करणारे एक निवेदन जारी केले. प्रीमियर लीगने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान १५३० खेळाडू आणि क्लब स्टाफची कोरोना चाचणी झाली.
जे खेळाडू आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे, त्यांना १० दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत १२ फेऱ्यांची चाचणी झाली असून एकूण ७६ कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. ऑगस्टपासून ही चाचणी सुरू आहे.