नवी दिल्ली -कोलकाता फ्रेंचायझी ईस्ट बंगालला इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) स्थान मिळाले आहे. आयएसएलमध्ये प्रवेश करणारा ईस्ट बंगाल एफसी आता ११वा संघ ठरला आहे. २०२०-२१मध्ये हा संघ आपला पदार्पणाचा सामना खेळेल. फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) अध्यक्ष नीता अंबानी यांनी या क्लबचे आयएसएलमध्ये स्वागत केले.
इंडियन सुपर लीगमध्ये नवा संघ दाखल - East bengal fc news
इंडियन सुपर लीगमध्ये दाखल झालेल्या नव्या संघाचे फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) अध्यक्ष नीता अंबानी यांनी स्वागत केले. बंगालमधील खेळाडूंना भारतीय फुटबॉलमध्ये असंख्य संधी असतील, असे नीता अंबांनी यांनी म्हटले.
नीता अंबानी म्हणाल्या, "आनंद आणि अभिमानाचा हा क्षण आहे. ईस्ट बंगाल एफसी आणि त्यांच्या करोडो चाहत्यांचे आम्ही आयएसएलमध्ये स्वागत करतो. ईस्ट बंगाल आणि मोहन बागान (आता एटीके मोहन बागान) यांच्या समावेशानंतर विशेषत: बंगालमधील खेळाडूंना भारतीय फुटबॉलमध्ये असंख्य संधी असतील.''
त्या म्हणाले, "पश्चिम बंगालने भारतातील या सुंदर खेळाला मोठा चालना दिली आहे. आयएसएलच्या या कामामुळे देशातील फुटबॉलला चालना मिळेल." महत्त्वाचे म्हणजे, ईस्ट बंगाल आयएसएलमध्ये सामील झाल्यानंतर एटीके मोहन बागान यांच्याशी त्यांची स्पर्धा उत्सुकतेची ठरेल.