महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फुटबॉल दिग्गज दिएगो मॅराडोना रूग्णालयात - दिएगो मॅराडोना लेटेस्ट न्यूज

मॅराडोना यांना अर्जेंटिनाच्या इपेन्सा क्लिनिकमध्ये नेण्यात आले. मॅराडोना सध्या जिम्नॅशिया वाय एग्रीगामा या स्थानिक क्लबचे प्रशिक्षक आहेत. १९८६मध्ये मॅराडोना यांचा अर्जेंटिना संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा होता. मॅराडोना यांना त्यांच्या विलक्षण जीवनशैलीमुळे आयुष्यात बर्‍याच वेळा रुग्णालयात जावे लागले.

diego maradona has been taken into hospital in argentina
फुटबॉल दिग्गज दिएगो मॅराडोना रूग्णालयात

By

Published : Nov 3, 2020, 3:57 PM IST

नवी दिल्ली -अर्जेंटिनाचे फुटबॉल दिग्गज दिएगो मॅराडोना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती स्थिर होण्यासाठी मॅराडोना यांना रुग्णालयात ठेवण्यात आले. काही दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. स्थानिक माध्यमांनी यासंबंधी वृत्त दिले.

दिएगो मॅराडोना

मॅराडोना यांना अर्जेंटिनाच्या इपेन्सा क्लिनिकमध्ये नेण्यात आले. मॅराडोना सध्या जिम्नॅशिया वाय एग्रीगामा या स्थानिक क्लबचे प्रशिक्षक आहेत. १९८६मध्ये मॅराडोना यांचा अर्जेंटिना संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा होता. मॅराडोना यांना त्यांच्या विलक्षण जीवनशैलीमुळे आयुष्यात बर्‍याच वेळा रुग्णालयात जावे लागले.

पोटाच्या अंतर्गत रक्तस्त्रावमुळे मॅराडोना यांना जानेवारी २०१९मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी, ते रशियामध्ये झालेल्या २०१८च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान आजारी पडले होते. तेथे ते अर्जेंटिना-नायजेरिया सामना पाहण्यासाठी गेले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details