महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मॅराडोनाच्या मृतदेहासोबत फोटो काढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या! - selfies with maradona's corpse

एका वृत्तानुसार, कर्मचारी मॅराडोनाच्या अंत्यसंस्कारासाठी तयारी करणार होते, पण त्यांनी शवपेटीसोबत फोटो काढले. या तिन्ही कर्मचार्‍यांना बाहेरून बोलावण्यात आले होते.

Diego Maradona funeral worker sacked for taking selfie
मॅराडोनाच्या मृतदेहासोबत फोटो काढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या!

By

Published : Nov 28, 2020, 3:06 PM IST

अर्जेटिना -दिवंगत फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या शवपेटीसह फोटो काढलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. बुधवारी वयाच्या ६०व्या वर्षी मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

क्लॉडिओ फर्नांडीझ, त्यांचा मुलगा इस्माईल आणि डिएगो मोलिना अशी नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. एका फोटोमध्ये फर्नांडीज आणि त्याचा मुलगा हसताना दिसत आहे. तर, मोलिना अशाच एका दुसर्‍या फोटोमध्ये दिसत आहेत.

कर्मचारी

एका वृत्तानुसार, कर्मचारी मॅराडोनाच्या अंत्यसंस्कारासाठी तयारी करणार होते, पण त्यांनी शवपेटीसोबत फोटो काढले. या तिन्ही कर्मचार्‍यांना बाहेरून बोलावण्यात आले होते.

फोटो व्हायरल झाल्यानंतर मागितली माफी -

हे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर क्लॉडियोने माफी मागितली आहे. ते म्हणाले, "मी सर्वांची क्षमा मागतो. मी मॅराडोनाचे वडील आणि मेहुणे यांच्यासाठी काम केले आहे. जिवंत असतानाही मी कधीही त्यांचा अनादर केला नाही. मला माहित आहे, की बर्‍याच लोकांना वाईट वाटते. मी या सर्वांकडून दिलगीरी व्यक्त करतो.''

ABOUT THE AUTHOR

...view details