नवी दिल्ली -दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी सुदेवा दिल्ली एफसी संघाचा शुभारंभ केला. हा संघ या हंगामात प्रथमच आय-लीगमध्ये खेळेल. यावर्षी आय-लीग ९ जानेवारीपासून कोलकाता येथे होणार आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे आय-लीग एका ठिकाणी आयोजित केली जात आहे.
संघाचा शुभारंभ करताना सिसोदिया म्हणाले, की आता नॅशनल लीगमध्ये दिल्लीचा संघ असेल आणि दिल्लीच्या लोकांना या संघाचा जयजयकार करण्याची संधी मिळेल. सुदेवा दिल्ली एफसी दिल्लीचा संघ आहे. प्रथमच दिल्लीचा फुटबॉल संघ आय-लीगमध्ये भाग घेत आहे. दिल्लीवासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे. ९ जानेवारी रोजी कोलकाता येथे आय-लीग सुरू होईल तेव्हा दिल्लीकर आपल्या संघाच्या सामन्यासाठी उत्सुक असतील आणि मला खात्री आहे की ते टीव्हीवर त्यांचा संघ पाहण्यास आतुर असतील".