नवी दिल्ली -कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेपूर्वी दिग्गज फुटबॉलपटू नेयमारला ब्राझील फुटबॉल संघाने कर्णधारपदावरून हटवले आहे. नेयमार जागी डॅनियल अल्वेसची ब्राझीलच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नेयमारला कर्णधार पदावरून हटवले, कोपा अमेरिका स्पर्धेत डॅनियलकडे असेल ब्राझीलचे नेतृत्व - Brazil
आगामी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलला गटसाखळीत बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि पेरू या संघांचा सामना करावा लागणार आहे
आगामी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेसाठी ब्राझीलच्या संघाची कमान आता डॅनियलकडे असणार आहे. या स्पर्धेत ब्राझीलला गटसाखळीत बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि पेरू या संघांचा सामना करावा लागणार असून ही स्पर्धा 14 जून ते 7 जुलैपर्यंत ब्राझीलमध्येच खेळली जाणार आहे.
नेयमारच्या नेतृत्वाखाली ब्राझीलच्या संघाने २०१८ च्या फिफा विश्वचषकात क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती. तसेच नेयमारला मागच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषकामध्ये 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' चा पुरस्कारही मिळाला होता.