रोम -पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने कोरोनाव्हायरसवर मात केली आहे. आयसोलेशन कालावधीनंतर रोनाल्डोची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. एका वृत्तानुसार, रोनाल्डो १३ ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर तो विलगीकरणात होता.
कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने रोनाल्डो पोर्तुगालसाठी एक आणि जुव्हेंटससाठी चार सामने खेळू शकला नाही. यामध्ये चॅम्पियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात बार्सिलोनाकडून ०-२ असा पराभव देखील सामील आहे. जुव्हेंटस आपला पुढील सामना रविवारी सेरी-ए येथे स्पेजिया विरुद्ध खेळणार आहे.