महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅनचेस्टर यूनायटेड क्लबकडून खेळणार - मॅनचेस्टर यूनायटेड

ख्रिस्तियानो रोनाल्डोने जुवेंटस क्लबची साथ सोडत आपला जुना क्लब मॅचेस्टर यूनायटेडसोबत करार केला आहे.

cristiano-ronaldo-leaves-juventus-to-join-manchester-united
ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅनचेस्टर यूनायटेड क्लबकडून खेळणार

By

Published : Aug 28, 2021, 4:18 PM IST

मॅनचेस्टर:स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रोनाल्डाने जुवेंटस क्लबची साथ सोडत आपला जुना क्लब मॅचेस्टर यूनायटेडसोबत करार केला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोची मॅनचेस्टर यूनायटेड क्लबमध्ये खूप वर्षांनंतर वापसी झाली आहे. शुक्रवारी यूनायटेड क्लबने ट्विट करत रोनाल्डोशी करार केल्याचे सांगितलं आहे.

यूनायटेड क्लबनने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ट्रान्सफरसाठी जुवेंटससोबत आमची चर्चा झाली. यात त्यांनी रोनाल्डोला ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली. हा करार वैयक्तिग अटी, वीजा आणि मेडिकल यांच्या अधीन करण्यात आला आहे. रोनाल्डो आमच्या संघात आल्याचे सांगताना आम्हाला आनंद होत आहे.

पाच वेळचा बॅलोडी आणि विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डोने आतापर्यंत त्याच्या करियरमध्ये 30 हून अधिक प्रमुख स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदामध्ये पाच वेळा यूईएफए चॅम्पियनसीप लीग, चार वेळा फीफा क्लब विश्व कप, इंग्लंड, स्पेन आणि इटलीमध्ये सात लीग विजेतेपदाचा समावेश आहे. मॅनचेस्टर यूनायटेडकडून खेळताना ख्रिस्तियानो रोनाल्डोने 292 सामन्यात 118 गोल केले होते.

दरम्यान, ख्रिस्तियानो रोनाल्डोची मॅचेस्टर यूनायटेड क्लबमध्ये वापसी झाल्याचे संघ आणखी मजबूत झाला आहे. आता रोनाल्डो कशी कामगिरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा -न्यूझिलंडचा माजी कर्णधार ख्रिस केन्सला शस्त्रक्रियेच्यावेळी पक्षाघाताचा झटका

हेही वाचा -टोकियो पॅरालिम्पिक 2020 : पहिल्यांदाच भारताची टेबल टेनिस खेळाडू उपांत्यफेरीत; भाविना पटेलची कामगिरी

ABOUT THE AUTHOR

...view details