रोम -पोर्तुगाल आणि जुव्हेंटसचा सुपरस्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. रोनाल्डोचा संघ जुव्हेंटसने नेपोलीचा २-० असा पराभव करत नवव्यांदा इटालियन सुपर कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या सामन्यात रोनाल्डोने गोल केला.
जुव्हेंटसच्या विजयासोबत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम - ख्रिस्तियानो रोनाल्डो लेटेस्ट न्यूज
रोनाल्डोच्या खात्यात आता ७६० गोल झाले आहेत. त्याने जोसेफ बिकनच्या ७५९ गोलच्या विक्रमाला मागे टाकले. स्पॅनिश फुटबॉल क्लब रियाल माद्रिदसाठी रोनाल्डोने सर्वाधिक ३११ गोल केले आहेत. याव्यतिरिक्त त्याने मॅन्चेस्टर युनायटेडसाठी ८४, स्पोटिंग सीपीसाठी ३ आणि जुव्हेंटसकडून ६७गोल केले आहेत.

पोर्तुगाल संघासाठी रोनाल्डोने १७० सामन्यात १०२ गोल केले आहेत. तो पोर्तुगालच्या अंडर-१५, अंडर-१७, अंडर-२०, अंडर-२१ आणि अंडर-२३ संघातही खेळला आहे. जुव्हेंटससाठी रोनाल्डोने हे चौथे विजेतेपद जिंकले आहे. रोनाल्डोने विजेतेपद पटकावल्याबद्दल आनंद व्यक्त केला. "इटलीमधील चौथ्या विजेतेपदामुळे मी खूप खूष आहे. मी जुव्हेंटसवर प्रेम करतो आणि हा संघ नेहमीच जिंकेल अशी माझी इच्छा आहे", असे रोनाल्डो सामन्यानंतर म्हणाला.