महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनाने घेतला दोघा क्रीडा पत्रकारांचा बळी

आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ (AIPS) ने दिलेल्या रिपोर्टनुसार, जोस मारिया कॅनडेला (५९) आणि थॉमस डीएज वाल्डेस (७८) या दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला.

Coronavirus Pandemic: Two Spanish Sports Journalists Killed By COVID-19
कोरोनाने घेतला दोघा क्रीडा पत्रकारांचा बळी

By

Published : Mar 21, 2020, 4:38 PM IST

माद्रिद- कोरोना विषाणूमुळे दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ (AIPS) ने दिलेल्या रिपोर्टनुसार, जोस मारिया कॅनडेला (५९) आणि थॉमस डीएज वाल्डेस (७८) या दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला. यासंदर्भात एआयपीएसने ट्विट केलं आहे.

दरम्यान, याआधी कोरोनामुळे स्पॅनिश फुटबॉल अ‌ॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबचा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचा वयाच्या २१ व्या वर्षी मृत्यू झाला होता. आता जोस मारिया कॅनडे आणि थॉमस डीएज वाल्डेस यांच्या मृत्यूनंतर क्रीडा विश्वात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ झाली आहे.

स्पॅनिश फुटबॉल क्लब व्हॅलेंसियाने एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यात त्यांनी, क्लबमधील ३५ टक्के खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं म्हटलं आहे.

कोरोनाची लागण झालेल्या सर्वांना वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आम्ही उर्वरित कर्मचारी आणि खेळाडूंना घरीच थांबण्याचे आदेश दिले असल्याचेही क्लबने निवेदनात स्पष्ट केले आहे.

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २ लाखापेक्षा अधिक आहे. कोरोनामुळे स्पेनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या हजाराच्या घरात पोहोचली आहे.

हेही वाचा -२१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू

हेही वाचा -सुनील छेत्री म्हणतो 'या' खेळात मी रोनाल्डो-मेस्सीला पाणी पाजू शकतो!

ABOUT THE AUTHOR

...view details