लॉस एंजलिस -कॅनडाची महिला फुटबॉल खेळाडू क्रिस्टीन सिंक्लेयरने फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. क्रिस्टीन आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणारी खेळाडू ठरली. कोनकाकाफ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तिने हा कारनामा केला.
हेही वाचा -'धर्म बदलण्यासाठी अनेकांचे प्रयत्न, हिंदू असल्याचा मला गर्व'
सेंट किट्स आणि नेविस संघाविरुद्ध क्रिस्टीनने ही कामगिरी केली. बुधवारी या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात क्रिस्टीनने आपल्या कारकीर्दीतील १८५ वा गोल नोंदवला. या आधी हा विक्रम अमेरिकेच्या एबी वॅमबॅकच्या नावावर होता. मात्र, आता क्रिस्टीनने तिला पछाडले आहे.
सेंट किट्स आणि नेविस संघाविरुद्ध हा सामना कॅनडाने ११-० ने खिशात घातला आहे. क्रिस्टीनच्या नावावर आलिम्पिकमध्ये ११ गोल आहेत.