लंडन - इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) क्लब चेल्सीचा फुटबॉलपटू कॉलम हडसन ओडोई याला सोमवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. लॉकडाऊन दरम्यान हडसनने घरी महिला मॉडेलला बोलावले होते. शिवाय, त्याने सोशल डिस्टन्सिंगचा नियमही मोडला असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाची लागण झालेल्या फुटबॉलपटूने घरी बोलावली मॉडेल! - hudson odoi latest news
पोलिसांनी हडसनला वेस्ट लंडनमधील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. हडसनने या महिलेला त्याच्या घरी येण्यास सांगितले होते. त्याने यासाठी गाडीही पाठवली. रविवारी पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी पोलिसांना ही माहिती मिळाली होती.
कोरोनाची लागण झालेल्या फुटबॉलपटूने घरी बोलावली मॉडेल!
स्थानिक मीडियामध्ये याची नोंद झाली आहे. पोलिसांनी हडसनला वेस्ट लंडनमधील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. हडसनने या महिलेला त्याच्या घरी येण्यास सांगितले होते. त्याने यासाठी गाडीही पाठवली. रविवारी पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी पोलिसांना ही माहिती मिळाली होती.
हडसन हा कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला इंग्लंडचा पहिला फुटबॉलपटू आहे. काही दिवसानंतर तो ठीक झाल्याचे त्याने सोशल मीडियावर सांगितले होते.